25th World Yoga Festival Inaugurated at Tapobhumi Ashram in Goa
Opening Ceremony of 25th World Yoga Festival at Tapobhumi Ashram in Goa, India. Grand Inaugurations of World Yoga Festival 2018 at Shree Kshetra Tapobhumi Gurupith in the divine presence of HH Sadguru Brahmeshanandacharya Jagatguru Dileepkumar Thankappan Adv Brahmidevi Ji and other esteemed guest including Vijai Sardesai Jayesh Salgaonkar
Super morning session was taken up by founder of World Yoga Community @dileep Thankappanfrom USA. More than 300 yogis from all over world took part in this session. Some of the special on stage presence were HH Sadguru Brahmeshanandacharya Mahamandaleswar Swami Shivananda Sarasvathi,Niranjan murtiji & others.
गोमंतकात विश्वयोग महोत्सवास प्रारंभ….
योगाचा प्रचार आणि प्रसार गोव्याच्या प्रत्येक घराघरात पोहोचला पाहिजे आणि गोव्याचे नाव जगाच्या नकाशावर आले पाहिजे.असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय सद्गुरु फाऊंडेशनचे संस्थापक एवं श्री दत्त पद्मनाभ पीठाचे पीठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी गोव्यात संपन्न होणार्या विश्वयोग महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना केले.
जगद्गुरु दिलीप कुमार थंकपन यांनी, “जगात शांती आणि एकता वृद्धींगत करण्यासाठी योग साधनेला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे” असे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवर, योगगुरू आणि आचार्यांनी जगाला शांती, एकता आणि योगसाधनेचा संदेश देण्याचा संकल्प केला.
दि. १ फेब्रुवारी २०१८ रोजी भव्य विश्वयोग महोत्सवाचा उvद्घाटन सोहळा देशविदेशातील विद्वान तथा योग साधकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र तपोभूमी गोवा येथे संपन्न झाला.विश्व योग समुदाय अमेरिका, आंतरराष्ट्रीय सद्गुरु फाऊंडेशन भारत, गोवा पर्यटन विकास महामंडळ गोवा सरकार, आयुष मंत्रालय भारत सरकार, सूर्य चंद्र योग आश्रम इटली, ग्लोबल योग अलायन्स दिल्ली तसेच इतर विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 ते 4 फेब्रुवारी 2018 पर्यंत या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
आंतरराष्ट्रीय सद्गुरु फाऊंडेशनचे संस्थापक एवं श्री दत्त पद्मनाभ पीठाचे पीठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली
गोमंतकात प्रथमच होणार्या या योग महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला जगद्गुरु दिलीप कुमार थंकपन, महामंडलेश्वर शिवानंद सरस्वतीजी,गुरु आनंद वितरंग(USA), योगी आशुतोषजी(दिल्ली), स्वामी यतीधर्मानंदजी(ओडिसा), डाॅ. गोपालजी, डाॅ. गोपालचंद, मोहम्मद इम्रान अली(दुबई), निरंजन मूर्ती(बेंगलोर), अॅड. गुरूमाता ब्राह्मी देवीजी – सेक्रेटरी आंतरराष्ट्रीय सद्गुरु फाऊंडेशन, विजय सरदेसाई – नगर नियोजन मंत्री-गोवा, पांडुरंग मडकईकर – वीज मंत्री , जयेश साळगावकर-गृहनिर्माण मंत्री इ. महनीय मान्यवर उपस्थित होते. वरिल मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. तसेच डाॅ. गोपालजी यांच्या “योग गीत” सीडीचे विमोचन धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या पावन हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अँड. गुरुमाता ब्राह्मी देवीजी यांना युथ चेंबर आॅफ कोमर्स तर्फे तपोभूमीवर स्थापन होणार्या युथ चेंबर आॅफ कोमर्स शाखेचे अध्यक्षपद देऊन गौरविण्यात आले. श्री.विजय सरदेसाई,श्री. पांडुरंग मडकईकर , श्री. जयेश साळगावकर यांनी योगसाधना ही निरोगी जीवनासाठी महत्वाची असल्याचे प्रतिपादन केले.
सकाळच्या सत्रात गुरु आनंद यांच्या योग विषयावरील कला प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. संध्याकाळी धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली सर्व योगसाधकांसाठी “दीपध्यान” हे विशेष सत्र घेण्यात आले. दि. २ फेब्रुवारी रोजी योग सत्र, अष्टांग योग परिचय, योगा फोर सस्टेनेबल डेवेलोपमेंट गोल्स ऑफ द युनायटेड नेशन्स अशा विविध विषयांवर आंतर्राष्ट्रीय योग विद्वानांचे मार्गदर्शन, योग आणि आरोग्य या विषयावर चर्चा सत्र आयोजित केलेले आहे.
या उद्घाटन सोहळ्यात स्वागत व प्रस्तावना अँड. गुरुमाता ब्राह्मी देवीजी तथा सूत्रसंचालन श्री चंद्रशेखर गावस यांनी केले.